शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी स्ट्राँगरुमच्या सुरक्षेचा आढावा
बालेवडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात उभारण्यात येणाऱ्या स्ट्राँगरुमच्या सुरक्षेची पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाहणी केली.
पुणे : पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने बालेवडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील स्ट्राँगरुमच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी ही पाहणी केली.
थ्री-टायर सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा आणि मेटल डिटेक्टर्स बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २३ ऑक्टोबरला मतदान तर २६ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
