खत खरेदीसाठी 'एफएफएफएस' प्रणाली २२ ऑक्टोबरपासून राज्यभर लागू, खतांचा साठा, उपलब्धता व आगाऊ बुकिंगची माहिती मोबाईलवर मिळणार
केंद्र शासनाने विकसित केलेली 'फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल' (FFFS) प्रणाली २२ ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार आहे.
पुणे : शेतकऱ्यांना खत खरेदी सोपी व पारदर्शक करण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेली 'फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल' (FFFS) प्रणाली २२ ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना खतांची उपलब्धता आणि साठ्याची माहिती मोबाईलवर मिळेल.
शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार खताचे आगाऊ बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध होईल. नाशिक जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवल्यानंतर आता ही प्रणाली राज्यभरात सुरू केली जात आहे.
