दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिकांसह चारा उत्पादनाला प्राधान्य
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात कृषि विभागातर्फे रब्बी पिके आणि चारा उत्पादनावर भर दिला जात आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी कृषि विभागातर्फे ३ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारी आणि ८० हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाचे प्रात्यक्षिक प्रकल्प राबवले जात आहेत. बियाणे, जैविक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करून दिली जात आहेत.
तसेच ७ हजार हेक्टर क्षेत्रावर चारा उत्पादन प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मका व कडवळ चारा पिकांसाठी शेतकरी मार्गदर्शन मोहीम राबवली जात आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी दिली.
