संपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वैभवशाली दुर्गापूजा महोत्सवास प्रारंभ
बालेवडी हायस्ट्रीट येथील साफा बँक्वेट येथे संपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे शारदीय दुर्गापूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : पुण्यातील बालेवडी हायस्ट्रीट येथील साफा बँक्वेटमध्ये संपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे शारदीय दुर्गापूजा २०२६ महोत्सवाचा थाटात प्रारंभ झाला. हा उत्सव १९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे.
यंदाच्या उत्सवाची संकल्पना 'मानुषेर माझे माँ' अशी आहे. महाआरती, सांस्कृतिक कार्यक्रम, सिंदूर खेला आणि बंगाली फूड फेस्टिव्हल हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. अध्यक्ष संजय बिश्वास व सचिव स्नेहा कुंडू यांनी माहिती दिली.
