विविध मंडळांना लोकोपयोगी साहित्याच्या भेटीतून नवरात्र उत्सव साजरा : संदीप खर्डेकर
क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध संस्था, मंदिरे आणि अंगणवाड्यांना उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

ठाणे : क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक व शैक्षणिक संस्था, मंदिरे आणि वस्ती भागातील अंगणवाड्यांना लोकोपयोगी साहित्य वितरित करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या हस्ते हे वाटप पार पडले.
अंगणवाडी सेविकांना स्पीकर सेट, दिव्यांगांना साहित्याची मदत आणि शाळांमध्ये शैक्षणिक भेट वस्तू देण्यात आल्या. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, संगीता वाद्रे, कुणाल तांडे आदी उपस्थित होते.
