सुनील शेट्टी यांच्या हस्ते वानवडीत टंगस्टन फिटनेस क्लबचे उद्घाटन
प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांच्या हस्ते पुण्यातील वानवडी येथे टंगस्टन फिटनेस क्लबच्या नवीन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

पुणे : ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते सुनील शेट्टी यांच्या हस्ते पुण्यातील वानवडी येथे 'टंगस्टन फिटनेस क्लब'च्या नवीन केंद्राचे उद्घाटन झाले. याप्रसंगी फिटनेस प्रेमी आणि उद्योजक उपस्थित होते.
क्लबचे संस्थापक विशाल नरेंद्र मंगल यांनी टंगस्टन फिटनेस क्लबच्या आधुनिक सोयी-सुविधांची माहिती दिली. क्रॉसफिट, झुंबा, योग आणि अद्ययावत व्यायाम उपकरणांची सोय येथे उपलब्ध करण्यात आली आहे.
