पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी (२३ ऑक्टोबर) मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे.
पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदानाच्या दिवशी सरकारी व खाजगी आस्थापनांमधील मतदारांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे.
ज्या मतदारांना पूर्ण दिवसाची रजा शक्य नाही, त्यांना मतदानासाठी २ ते ४ तासांची सवलत देण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिले आहेत.
