देशाचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देश सहन करणार नाही : कामगारनेते यशवंतभाऊ भोसले
युट्युबर ध्रुव राठी आणि इतरांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाच्या घटनात्मक पदांचा अपमान केला जात असल्याचा आरोप कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी केला.

पिंपरी : राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष आणि कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना युट्युबर ध्रुव राठी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. देशाचा आणि पंतप्रधानांचा अपमान देशवासी सहन करणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
पंतप्रधान मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढवली आहे. त्यांच्यावर होणारी अभद्र टीका योग्य नसून, मतदार या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देतील, असे भोसले म्हणाले.
