मतदारांनी डॉ स्मिता योगेश जाधव व कौस्तुभ गावडे या भाजपच्या उमेदवारांना मतदान करावे - कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्याचे आवाहन यशवंतभाऊ भोसले यांनी केले.

पिंपरी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे या भाजप उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले.
दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित व सामाजिक क्षेत्राशी जोडलेले असून, पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडण्यासाठी ते योग्य प्रतिनिधी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
