पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभेत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक; महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा निर्धार : आमदार प्रसाद लाड
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीच्या तयारीसाठी पिंपरी विधानसभेत भाजपची बैठक पार पडली; महायुतीचे दोन्ही उमेदवार जिंकून आणण्याचा निर्धार आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता युवा मोर्चा आणि भाजपची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रसाद लाड व आमदार अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली.
महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा बूथनिहाय आढावा घेण्यात आला. सर्व पदाधिकाऱ्यांनी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचून महायुतीला विजय मिळवून देण्याचे आवाहन लाड यांनी केले.
