आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पवना नदीवरील पाडलेला बंधारा पुन्हा बांधण्याची आयुक्तांकडे मागणी

    पिंपळे सौदागर व पिंपरी मिलिटरी डेअरी फार्म परिसरातील पवना नदीवरील पाडलेला बंधारा पुन्हा बांधण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल उबाळे यांनी केली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १९ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपळे सौदागर आणि पिंपरी मिलिटरी डेअरी फार्म परिसरातील पवना नदीवर पूर्वी असलेला बंधारा पुन्हा उभारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल उबाळे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

    काही वर्षांपूर्वी हा बंधारा पाडल्यामुळे परिसरातील भूजल पातळी वेगाने खालावली असून डासांचा उपद्रव वाढला आहे. तसेच नदीचे पाणी दूषित होत असून पालिकेने जनहित लक्षात घेऊन बंधाऱ्याची पुनर्बांधणी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.