आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    पाणी वापराच्या काटकसरीबाबत गावागावात जनजागृती करा : पालकमंत्री नरहरी झिरवाळ

    हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पाणी टंचाई व काटकसरीने पाणी वापराबाबत आढावा बैठक घेतली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १९ ऑक्टोबर २०२६

    हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या तुटीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतला. गावागावात पाणी वापराच्या काटकसरीबाबत व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

    पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन जलसाठ्यांचे नियोजन करावे आणि ३० टक्के सांडपाण्याचा पुनर्वापर करावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व इतर अधिकारी उपस्थित होते.