आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी व्यावसायिक पाठबळ आवश्यक : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    बोरीवली येथील ओबेरॉय स्कायसिटी मॉलमध्ये दिव्यांगांद्वारे चालवल्या जाणाऱ्या 'मिट्टी कॅफे'चे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते झाले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १९ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : मुंबईतील बोरीवली येथील ओबेरॉय स्कायसिटी मॉलमध्ये पूर्णपणे दिव्यांग व्यक्तींकडून चालवल्या जाणाऱ्या 'मिट्टी कॅफे'चे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पार पडले. दिव्यांगांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना व्यावसायिक संधी देणे गरजेचे असल्याचे राज्यपाल म्हणाले.

    मिट्टी कॅफेच्या संस्थापक एलिना आलम यांनी सांगितले की, देशाभरात ८० ठिकाणी हे कॅफे सुरू असून त्यातून २ हजारहून अधिक दिव्यांगांना सन्मानाने रोजगार मिळाला आहे. प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक शिशिर जोशी व मान्यवर उपस्थित होते.