आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    खासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक - सार्वजनिक आरोग्य विभागाचे निर्देश

    महाराष्ट्रातील सर्व खाजगी रुग्णालये आणि नर्सिंग होमना उपचारांचे व सेवांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे सार्वजनिक आरोग्य विभागाने बंधनकारक केले आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · १९ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील सर्व खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय आस्थापनांना वैद्यकीय सेवा व सुविधांचे दर रुग्णांना सहज दिसतील अशा ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत.

    रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचाराच्या संभाव्य खर्चाची पूर्वकल्पना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरपत्रक मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये असणे अनिवार्य असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.