पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन
पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुंबईतील नायगाव पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या १५४ पोलीस अधिकाऱ्यांना व अंमलदारांना श्रद्धांजली वाहिली.
मुंबई : पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुंबईतील नायगाव पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या ३६ पोलीस अधिकारी आणि ११८ पोलीस अंमलदार अशा एकूण १५४ पोलीस हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर पोलीस महासंचालक अभिषेक त्रिमुखे, मधूकर पांडे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
