आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    अंबाबाई दर्शनाहून परतताना काळाचा घाला! भीषण अपघातात चार मित्रांचा दुर्दैवी अंत

    कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराहून दर्शन घेऊन परतणाऱ्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील चार तरुणांचा कराडजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर स्कॉर्पिओ अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २१ ऑक्टोबर २०२६

    कराड : कराडजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या चार तरुण मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले.

    मृत्यू झालेले सर्व तरुण सातारच्या खटाव तालुक्यातील कातारखटाव गावचे रहिवासी आहेत. तेजस देशमुख (२४), सागर निंबाळकर (२३), सुयश चिंचकर (२०) आणि रोहित धोत्रे (२१) अशी मृतांची नावे आहेत. तर ऋतुराज डुबले (२१), शंतनू शिंगाडे (२०) व अमन तांबोळी (२३) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.