सेवा संकल्प अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात कृषी विभागाची मोहीम
पुणे जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत ७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले असून पीएम किसान योजनेतून १,९०८ कोटी रुपयांचे थेट वाटप करण्यात आले.
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत पुणे जिल्ह्यात कृषी विभागामार्फत ७ लाख २४ हजार ४५३ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले आहेत.
तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४.५९ लाख शेतकऱ्यांना २ लाख ८३ हजार ८६८ रुपयांचे थेट वाटप करण्यात आले असून एकूण १,९०८ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे.
