टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजन, २२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
पुणे टपाल विभागामार्फत २७ ऑक्टोबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले असून, निवृत्तीवेतनधारकांनी २२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत.
पुणे : पुणे टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पुणे शहर टपाल कार्यालय अधीक्षक कार्यालयात पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
तक्रारींचा विहित नमुन्यातील अर्ज २२ ऑक्टोबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. टपाल विभागातून निवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनविषयक तक्रारींवर या अदालतीत विचार केला जाईल.
