विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नोंदली आणि नो-मॅपिंगच्या कामाला गती; राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन
पुणे जिल्ह्यातील मतदार यादी पुनरीक्षण आणि नो-मॅपिंगच्या कामाला गती देण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले.
पुणे : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नोव्हेंबरपर्यंत प्रलंबित दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या कालावधीत जास्तीत जास्त पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले आहे.
बदल करण्यात आलेल्या मतदान केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून राजकीय पक्षांनी मतदारांना याबाबत अवगत करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
