आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    दिवाळी फराळाचे पदार्थ परदेशात पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज

    बारामती टपाल विभागाने परदेशातील नातेवाईकांना वाजवी दरात दिवाळी फराळ पाठवण्यासाठी विशेष पार्सल सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २१ ऑक्टोबर २०२६

    बारामती : बारामती टपाल विभागाने परदेशातील नातेवाईकांना दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी विशेष पार्सल सेवा सुरू केली आहे. नागरिकांना घरबसल्या किंवा टपाल कार्यालयात येऊन वाजवी दरात पार्सल पाठवता येणार आहे.

    या सेवेचा लाभ घेण्यासाठी पोस्टमन घरी येऊन फराळाचे पार्सल स्वीकारतील. बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, शिरूर भागातील नागरिकांना ९०९६४४४९९९ किंवा ७००७९७५६५५ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.