ऑलिम्पिकचे स्वप्न ते सूडाची तहान: प्राइम व्हिडियोच्या एमएक्स ओरिजिनल'ची 'दुनिया की ठयां ठयां' प्रेक्षकांना अशांत प्रवासावर घेऊन जाण्यासाठी सज्ज; आता ट्रेलर प्रदर्शित
प्राइम व्हिडियोने २२ ऑक्टोबर रोजी रिलीज होणाऱ्या 'दुनिया की ठयां ठयां' या नव्या ओरिजिनल सीरिजचा ट्रेलर रिलीज केला आहे.
पुणे : प्राइम व्हिडियोने २२ ऑक्टोबर रोजी प्रसारित होणाऱ्या 'दुनिया की ठयां ठयां' या नव्या एमएक्स ओरिजिनल सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. सचिन पांंडे यांच्या संकल्पनेवर आधारित या सीरिजचे दिग्दर्शन नितीन केसवानी यांनी केले आहे.
ऋषभ जयस्वाल आणि दिपाली शर्मा प्रमुख भूमिकेत असून, ही कथा राजकीय तणाव, प्रेम, विश्वासघात आणि सूडाच्या प्रवासावर प्रकाश टाकते.
