पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजन
पुणे जिल्हा प्रशासनाने संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी ५.५ लाख टन चारा उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन केले आहे.
पुणे : संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्याबरोबरच टंचाईग्रस्त जिल्ह्यांना मदत करता यावी यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने सुमारे २२ ते २५ हजार एकर क्षेत्रावर चारा उत्पादनाचे नियोजन केले आहे. यातून ५.५ लाख टन चारा उत्पादन अपेक्षित आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंचन सुविधा असलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. सध्या जिल्ह्यात तीन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले.
