विधान परिषद पदवीधर व शिक्षक निवडणुकीत असे करा मतदान
विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी विधान परिषद पदवीधर व शिक्षक निवडणुकीतील पसंतीक्रम मतदान पद्धती आणि नियम याबाबत सविस्तर माहिती दिली.
पुणे : विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदानाची पद्धत समजून सांगताना विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी मतदारांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवताना केवळ १, २, ३ असे आकडेच लिहावेत.
मतदानासाठी केंद्रावर दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा. इतर कोणत्याही पेनचा वापर केल्यास मतपत्रिका अवैध ठरेल. एकापेक्षा जास्त उमेदवारांना १ हा अंक देऊ नये, असा स्पष्ट नियम आहे.
