बारामतीत अडकवलेल्या बेवारस वाहनांचा होणार जाहीर लिलाव
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची बेवारस व जप्त वाहने सोडवून घेण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर जाहीर लिलाव केला जाणार आहे.
बारामती : बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात विविध कारणांमुळे अडकवून ठेवलेल्या बेवारस व जप्त वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. ही वाहने वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत.
संबंधित वाहनांचे मालक किंवा कायदेशीर वारस यांनी ७ दिवसांच्या आत आवश्यक पुरावे व कागदपत्रांसह बारामती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.
