आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    अर्थ

    भारतातील पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण मूल्य श्रेणीत वाढत आहे: कोटक प्राइम

    कोटक महिंद्रा प्राइमच्या अभ्यासानुसार भारतातील प्रथमच कार खरेदी करणारे ग्राहक आता प्रिमियम व मिड-एसयूव्ही सेगमेंटच्या कार खरेदीला प्राधान्य देत आहेत.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २१ ऑक्टोबर २०२६

    पुणे : कोटक महिंद्रा प्राइम लि. च्या अभ्यासानुसार भारतात पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा कल बदलत आहे. पूर्वी ५ लाख रुपयांपर्यंतच्या कार घेणारे तरुण आता १.५ ते २.५ लाख रुपये अधिक खर्च करून प्रिमियम श्रेणीतील कार खरेदी करत आहेत.

    मध्यम आकाराच्या एसयूव्ही, आरामदायीपणा आणि प्रगत सुरक्षेची वैशिष्ट्ये असलेल्या गाड्यांना पहिली पसंती दिली जात असल्याचे कोटक प्राइमचे व्यवस्थापकीय संचालक सूरज राजन यांनी सांगितले.