सणासुदीच्या काळात FDA ची मोठी कारवाई; कर्नाटकातून आलेला १० टन संशयास्पद खवा-पनीर जप्त
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुण्यात कर्नाटकातून आलेल्या सुमारे ३५ लाख रुपये किमतीचा १० टन संशयास्पद खवा आणि पनीरचा साठा जप्त केला.
पिंपरी : दसरा व दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत कर्नाटकातून पुण्यात आणण्यात आलेला सुमारे ३५ लाख रुपये किमतीचा १० टन संशयास्पद खवा आणि पनीरचा साठा जप्त केला.
कसबा पेठ आणि बिबवेवाडी परिसरात तीन ते चार वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. जप्त केलेल्या खवा व पनीरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सणासुदीत नागरिकांनी विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच मिठाई खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
