आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    महायुतीच्या एकत्रित ताकदीमुळे स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांचा विश्वास

    पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा महायुतीच्या ताकदीमुळे विजय निश्चित असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी आकुर्डी येथील मेळाव्यात व्यक्त केला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २१ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी आकुर्डी येथे महायुतीचा मेळावा पार पडला. महायुतीच्या एकत्रित ताकदीमुळे दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी व्यक्त केला.

    यावेळी माजी महापौर रवी लांडगे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. २५ वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपकडे असून तो कायम राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.