आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध; समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू : राज्यमंत्री योगेश कदम

    रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे आयोजित माजी सैनिक मेळाव्यात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध असून आर्थिक मदतीत दुप्पट वाढ केल्याचे घोषित केले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २१ ऑक्टोबर २०२६

    रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे आयोजित माजी सैनिक मेळाव्यात बोलताना गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी सैनिकांच्या कल्याणासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगितले. माजी सैनिकांच्या समस्या प्रशासकीय समन्वयातून सोडवण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

    कल्याणकारी निधीतून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तसेच अग्निवीरांना राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.