आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    बप्पी लाहिरी यांच्या संगीताचा वारसा सदैव प्रेरणा देत राहील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबईतील जुहू येथे दिवंगत संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या निवासस्थानाजवळ 'संगीतकार बप्पी लाहिरी मार्ग'चे नामकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २१ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : मुंबईतील जुहू परिसरात दिवंगत संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या निवासस्थानाजवळील मार्गाचे 'संगीतकार बप्पी लाहिरी मार्ग' असे नामकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

    बप्पीदा यांनी आपल्या संगीताद्वारे अनेक पिढ्यांना आनंद दिला असून त्यांचे संगीत अजरामर राहील, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला जितेंद्र, अलका याज्ञिक, उदीत नारायण, के. एस. चित्रा आणि लाहिरी कुटुंबीय उपस्थित होते.