आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून चाकण औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधावा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे उद्योजकांना आवाहन

    चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी, रस्ते व पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन आणि उद्योजकांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २२ ऑक्टोबर २०२६

    पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्या जाणून घेऊन त्यांच्या निवारणासाठी प्रशासन आणि उद्योग प्रतिनिधींनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा. पायाभूत सुविधा, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक नागरिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

    चाकण येथे उद्योजकांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. ५८ किलोमीटरच्या रस्त्यांच्या एकात्मिक विकासाचे नियोजन करण्यात येत असून अतिक्रमणे हटवणे, रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा व जलनिस्सारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

    कामाच्या वेळांमध्ये टप्प्याटप्प्याने बदल करणे, कामगारांसाठी निवास व वाहतूक व्यवस्था विकसित करणे, आणि रस्त्यांचे सुशोभीकरण व सुरक्षा यावर उद्योजकांनी भर द्यावा, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.