आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मनाई आदेश जारी

    पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्थेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी कलम १६३ अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २२ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान व २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासनाकडून विविध मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

    भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रात परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मतदान व मतमोजणी केंद्रांच्या १०० मीटर परिसरात टपरी, अनावश्य सेवा वर्ज्य ठेवून ध्वनिक्षेपकाचा वापर किंवा उपद्रव निर्माण करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.