दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ८५ टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण, आंबेगाव व जुन्नर तालुक्यांतील २५ टक्के पंचनामे पूर्ण, पंचनाम्याचे काम गतीने सुरू
पुणे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ८ तालुक्यांमध्ये पिकांचे ८५ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून जुन्नर व आंबेगाव तालुक्यात २५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून गतीने सुरू आहेत. ८ तालुक्यांमध्ये ८५ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात २५ टक्के पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे.
भोर, वेल्हे, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांतील सुमारे २ लाख ६१ हजार ३१४ हेक्टर क्षेत्रातील ३ लाख ५६ हजार ९५४ खातेदारांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित कामही लवकरच पूर्ण केले जाईल, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
