आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबरला आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश

    पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबरला आंबेगाव, खेड, बारामती व इंदापूर तालुक्यातील ठराविक आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २२ ऑक्टोबर २०२६

    पुणे : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी संबंधित गावांमधील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

    आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक व घोडेगाव, इंदापूर तालुक्यातील बावडा, खेड तालुक्यातील राजगुरुनगर आणि बारामती तालुक्यातील लोणीभापकर येथील आठवडे बाजार शुक्रवारी बंद राहतील. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.