हनुमानाच्या आध्यात्मिक संकल्पना उलगडणारे पुस्तक प्रकाशित
आनंद महेश तलारी लिखित हनुमानाच्या आध्यात्मिक कथा व मंत्रांचा अर्थ स्पष्ट करणारे 'द इन्फिनिट हनुमान' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

नवी दिल्ली : हनुमानाच्या आध्यात्मिक विश्वाची ओळख सोप्या भाषेत करून देणारे लेखक आणि संवाद रणनीतीकार आनंद महेश तलारी यांचे 'अनंत हनुमान' (हिंदी) आणि 'द इन्फिनिट हनुमान' (इंग्रजी) हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मोतीलाल बनारसीदास प्रकाशनाने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
या पुस्तकात अष्टसिद्धी आणि नवनिधी यांचे स्पष्टीकरण, दररोजच्या जीवनातील त्यांचे महत्त्व आणि हनुमानाच्या जीवनातील प्रेरणादायी कथा तीन भागांत मांडल्या आहेत. प्रौढ आणि तरुण अशा सर्व वाचकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
