फ्युएलचा द्वितीय दीक्षांत सोहळा २४ ऑक्टोबरला- राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा
पिरंगुट येथील फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटीत २४ ऑक्टोबरला राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या उपस्थितीत द्वितीय दीक्षांत सोहळा पार पडणार आहे.
पुणे : फ्रेंड्स युनियन फॉर एम्पावरिंग लाइव्ह्ज (फ्युएल) या संस्थेचा २० वा वर्धापन दिन आणि द्वितीय दीक्षांत समारंभ शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता पिरंगुट येथील फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये होणार आहे.
या कार्यक्रमाला तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दीक्षांत समारंभात व्यवस्थापन तुकडीतील विद्यार्थ्यांना आणि सीएसआर पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
