पीएनजी ज्वेलर्सच्या 'अनस्टॉपेबल लेगसी' या नव्या ब्रँड मोहिमेसाठी माधुरी दीक्षित आणि रणबीर कपूर एकत्र
पीएनजी ज्वेलर्सने आपल्या 'अनस्टॉपेबल लेगसी' मोहिमेसाठी माधुरी दीक्षित व रणबीर कपूर यांना एकत्र आणून ब्रँडचा वारसा अधोरेखित केला आहे.

पुणे : पीएनजी ज्वेलर्सने आपल्या नव्या 'अनस्टॉपेबल लेगसी' या मोहिमेसाठी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता रणबीर कपूर यांना एकत्र आणले आहे. या मोहिमेची जाहिरात डिजिटल आणि टीव्ही माध्यमांवर प्रदर्शित होत आहे.
पीएनजी ज्वेलर्सच्या १८३ वर्षांच्या समृद्ध वारशाचे आणि विश्वासाचे प्रतिनिधित्व या मोहिमेतून केले जात आहे. ग्राहकांनी पिढ्यानपिढ्या ठेवलेला विश्वास पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे, असे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.
