पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार असून २७ ऑक्टोबरला बालेवाडी क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे.
पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. पदवीधर मतदारसंघासाठी १६० तर शिक्षकांसाठी ७२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
पदवीधर मतदारसंघात ४७ तर शिक्षक मतदारसंघात ३० उमेदवार रिंगणात आहेत. २७ ऑक्टोबर रोजी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी पार पडणार आहे. मतदानासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात आले.
