आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी वाहतुकीत बदल

    स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे मार्केट यार्ड व बिबवेवाडी परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २२ ऑक्टोबर २०२६

    पुणे : स्वारगेट ते कात्रज दरम्यान भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने मार्केट यार्ड परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

    अपर बिबवेवाडी कडून चंद्रलोक चौक मार्गे स्वागेत, मार्केटयार्ड, उत्सव हॉटेलकडे उजवीकडे वळण्यास बंदी करण्यात आली आहे. तसेच भापकर पेट्रोल पंपाच्या बाजूने पुष्पमंगल चौकातून कात्रज कडे बिबवेवाडी मार्गे वळवण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.