विविध क्षेत्रातील ३५० हून अधिक कर्तृत्ववान महिलांचा 'स्त्री शक्ती सन्मान' उपक्रमांतर्गत गौरव
केआरए ज्वेलर्सतर्फे नवरात्रोत्सवाच्या औचित्याने ३५० हून अधिक कर्तृत्ववान महिलांना 'स्त्री शक्ती सन्मान' पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुणे : कृष्णा राजाराम अष्टेकर (KRA) ज्वेलर्सतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३५० हून अधिक कर्तृत्ववान महिलांचा 'स्त्री शक्ती सन्मान' उपक्रमांतर्गत गौरव करण्यात आला.
पोलीस, वकील, डॉक्टर, खेळाडू, शिक्षिका अशा विविध क्षेत्रातील महिलांच्या योगदानाची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे संचालक अतुल अष्टेकर यांनी सांगितले.
