पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ७४१ पदवीधर व ३१० शिक्षक मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.
पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. पदवीधर मतदारसंघासाठी ७४१ तर शिक्षक मतदारसंघासाठी ३१० मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे.
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत ही निवडणूक पार पडणार असून सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा, दिव्यांगांसाठी रॅम्प, प्रकाश आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी बालेवाडी क्रीडा संकुलात होईल.
