आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पिंपळे सौदागरमध्ये २.५ एमएलडी क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात यावा; माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

    पिंपळे सौदागर भागात २.५ एमएलडी क्षमतेचा जलकुंभ उभारण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २२ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपळे सौदागर परिसरातील वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक २८ मध्ये २.५ एमएलडी क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

    या भागात मोठ्या प्रमाणात निवासी इमारती झाल्याने भविष्यात पाण्याचा तुटवडा जाणवू नये म्हणून विकास आराखड्यातील आरक्षित जागेवर जलकुंभ उभारणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.