आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पिंपरी महापालिकेत आयुक्तांचा निलंबनाचा धडाका; सात महिन्यात ११ जणांचे निलंबन

    पिंपरी महापालिकेत कामातील हलगर्जीपणा आणि गैरवर्तनामुळे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी गेल्या सात महिन्यांत ११ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २२ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत कामात हलगर्जीपणा, कर्तव्यकसुरी आणि प्रशासकीय गोपनीयता भंग केल्याप्रकरणी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी गेल्या सात महिन्यांत ११ अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

    कामातील अनियमितता, मद्यपान करून कर्तव्यावर येणे आणि लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे स्थापत्य, अग्निशामक, वैद्यकीय व बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांवर ही कारवाई झाली. प्रशासनात शिस्त आणण्यासाठी ही कारवाई सुरुच राहील असे संकेत दिले आहेत.