पिंपरी-चिंचवडमधील ३६५ नैसर्गिक नाल्यांवर अनधिकृत बांधकामे, महापालिका उचलणार मोठे पाऊल
पिंपरी-चिंचवडमधील ३६५ नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणांवर पालिका कारवाई करणार असून पहिल्या टप्प्यात ६७ नाल्यांवरील बांधकामे हटवली जाणार आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील ३६५ नैसर्गिक नाल्यांवर अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे झाल्याचे महापालिकेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना त्रास होतो.
पहिल्या टप्प्यात ६७ नाल्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून बॉक्स कलव्हर्ट उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे जलनिस्सारण विभागाने सांगितले.
