आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    संभाव्य पाणीटंचाईचे गावनिहाय कृती आराखडे २५ ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत : मंत्री गुलाबराव पाटील

    संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावनिहाय कृती आराखडे २५ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २२ ऑक्टोबर २०२६

    मुंबई : राज्यातील संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन गावनिहाय वस्तूनिष्ठ कृती आराखडे २५ ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

    जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण असलेल्या योजना तातडीने पूर्ण कराव्यात. टंचाई काळात विहीर अधिग्रहण, टँकरचा वापर आणि नळ योजनांची दुरुस्ती वेळेत करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.