आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    लघुलेखन अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदतवाढ

    औंध आयटीआयमधील लघुलेखन अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जांची कागदपत्रे जमा करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २२ ऑक्टोबर २०२६

    पुणे : औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) ऑनलाइन भरलेल्या लघुलेखन अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जांची कागदपत्रे जमा करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

    इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह औंध आयटीआयमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन उपप्राचार्य अ. अ. साबळे यांनी केले आहे.