आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांचा गौरव

    नवी दिल्लीतील ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्रातील तीन कलाकारांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय कला पुरस्काराने गौरविण्यात आले.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २२ ऑक्टोबर २०२६

    नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्रातील तीन कलाकारांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित राष्ट्रीय कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    रमेश विठ्ठल थोरात, सिद्धार्थ शाहजीराव शिंगाडे आणि प्रितम मधुकर देवकर या कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींसाठी हा गौरव मिळाला. देशभरातून आलेल्या २४९५ कलाकारांच्या ६१७५ कलाकृतींमधून या कलाकारांची निवड झाली होती.