दुष्काळग्रस्त भागातील बालकांच्या पोषणाकडे विशेष लक्ष
दुष्काळग्रस्त भागातील बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी व गरोदर मातांना पोषण सुविधा देण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागात बालकांमधील कुपोषण रोखण्यासाठी आणि गरोदर व स्तनदा मातांना आरोग्य-पोषण सेवा पुरवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
राज्यातील ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असून तेथील अंगणवाडी केंद्रांमार्फत पोषण आहार, पिण्याचे पाणी आणि आरोग्य तपासणी नियमित पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुष्काळग्रस्त भागातील स्थलांतरित बालकांवर विशेष लक्ष ठेवले जाईल.
