आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    महाराष्ट्र

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

    महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात मतदानाचा हक्क बजावला.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २४ ऑक्टोबर २०२६

    नागपूर/मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील दादाजी धुनिवाले उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

    यावेळी त्यांनी राज्यातील सर्व पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. अमरावती शिक्षक मतदारसंघात ९१.०८ टक्के तर नागपूर पदवीधर मतदारसंघात ६४ टक्के प्राथमिक मतदानाची नोंद झाली आहे. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.