परीक्षा अर्जासाठी 'झिरो चलन' सुविधा उपलब्ध - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेत 'झिरो चलन' सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
मुंबई : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा एकही रुपया न भरता 'झिरो चलन' सुविधेद्वारे परीक्षा अर्ज दाखल केले आहेत.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले की, दुष्काळग्रस्त भागातील कोणत्याही पात्र विद्यार्थ्याला या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना सर्व विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.
