साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियम; अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना
बारामतीत साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीदरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी आरटीओने विशेष सुरक्षा नियम लागू केले आहेत.

बारामती : साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात ऊस वाहतुकीदरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती यांच्या वतीने विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉली व ट्रॅक्टरवर रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे, वाहनांचा वेग मर्यादित ठेवणे, वाहनात मोठे स्पीकर न लावणे आणि मद्यप्राशन करून वाहन न चालवणे अशा कडक सूचना यावेळी देण्यात आल्या.
